शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत न केल्यास तीव्र आंदोलन : राजू शेट्टी

Foto
 पैठण, (प्रतिनिधी) : अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पैठण येथे रस्ता रोको प्रसंगी बोलताना दिला.

शनिवारी दुपारी पैठण संभाजीनगर रोडवर सह्याद्री चौक येथे माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. 

शासन ओला दुष्काळ जाहीर करत नाही ओला दुष्काळ जाहीर केल्यास शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी लागेल. विद्यार्थ्यांच्या फी माफ करावी लागेल शेतकऱ्यांना विविध सवलती द्याव्या, लागतील यामुळे राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ
करत आहे. शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी तसेच पुरामुळे बाधित झालेले शेतकरी, नागरिक व्यापारी यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्यावी नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

या आंदोलनात माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, शेतकरी संघटनेचे माऊली मुळे, यांचीही भाषणे झाली. या आंदोलनात पवन सिसोदे, चंद्रशेखर सरोदे, विष्णू बोडखे, सुरेश काळे, किशोर ढगे, रावसाहेब लवांडे, कृष्णा साबळे, अजम खान, संतोष तांबे, राजू बोगाने, भास्कर खरात, विकास जाधव, गणपत खरे, सचिन बोडखे, शिवाजी धरपळे, सुखदेव लबडे, योगेश घोणे, भाऊसाहेब थोरात, संतोष कणके, मोहनराव खताळ, भाऊसाहेब नरके, योगेश औटे, प्रशांत भुमरे, शिशुपाल औटे, अनिरुद्ध चौधरी, शिवाजी साबळे, कल्याण वाघ, दिनकर पवार, आप्पा मेने, कृष्णा काळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.